सावळा गाेंधळ ! आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा 'मागचे पाढे पंचावन्न'

मुंबई - आरोग्य विभागाच्या परिक्षा केंद्रांवर पुन्हा गोंधळ झाला आहे. अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिकेस दहा मिनीटे उशीर झाला आहे, त्यामुळे विद्यार्थी उमेदवार संतापले आहेत. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. परंतु, तरीही विद्यार्थ्यांचे समाधान झालेले नाही. 

आरोग्य विभागाच्या परिक्षेचा गोंधळ अजूनही सुरुच आहे. रविवारी नाशिक आणि पुणे येथील केंद्रांवर परिक्षेचा गोंधळ दिसला. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुणे येथे विद्यार्थ्यांना दहा मिनिटे उशिराने पेपर मिळाल्याची कबुली टोपे यांनी केली. दहा मिनिटे उशीर झालेला वेळ भरून काढण्य़ात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

काही ठिकाणी प्रश्नपत्रिकेच्या बॉक्सवरील डिजीटल लॉक वेळेवर उघडले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यास उशीर झाला. पुण्यातील अनेक केंद्रांवर प्रश्नपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांना पाच ते दहा मिनिटे वाट पाहावी लागली. पुन्हा प्रश्नपत्रिकेला वेळ झाल्याने विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात येणार आहे.

सुरुवातीपासूनच आरोग्य विभागाच्या परिक्षेच्या गोंधळ सुरु आहे. राज्य सरकारने परिक्षा एमपीएससीमार्फत घ्यावी अशी मागणी केली होती. मात्र तरीही राज्य सरकारने गांभीर्य घेतलेले नाही. आज पुन्हा परिक्षा केंद्रांवर न्यासा या परिक्षा घेणाऱ्या कंपनीचा अनेक केंद्रांवर गोंधळ पाहायला मिळाला.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !