अरेरे ! 'जी-मेल'ची सेवा डाऊन, 'लॉगिन' आणि 'अ‍ॅक्सेस' करण्यात अडचणी

MBP Live24 ब्युरो - गुगलच्या 'जी-मेल' सेवा ठप्प झाल्यामुळे नागरीक ट्विटरवर #GmailDown ट्रेंड करत आहेत. बरेच यूजर त्यांची जी मेल सेवा बंद असल्याचे सांगत आहेत. 

गेल्या आठवड्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुक वापरकर्त्यांना देखील अशाच प्रकारचा त्रास सहन करावा लागला होता. दि. ४ ऑक्टोबरला फेसबुकसह इंस्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅप तब्बल ८ तास बंद होते.

ई-मेल पाठवताना अडचण - 'जी मेल' सेवा भारताच्या काही भागात काम करत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे लोक ईमेल पाठवू शकत नाहीत. डाउन डिटेक्टरच्या मते, ६८ % वापरकर्त्यांनी त्यांना वेबसाइटसह समस्या येत आहेत, असे सांगितले.

१८ टक्के नागरिकांनी सर्व्हर कनेक्शनची नोंद केली. त्याच वेळी, १४ % लोकांनी लॉगिन होत नसल्याची समस्या नोंदवली. भारताबरोबरच इतर काही देशांतील वापरकर्त्यांनीही ट्विटरवर अशा तक्रारी केल्या आहेत. 

लॉगिन आणि ईमेल पाठवताना त्यात एक समस्या आहे. अनेक वापरकर्ते जी-मेल सेवा बंद असल्याबद्दल सांगत आहेत. गुगलने मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

एक आठवड्यापूर्वी फेसबुक बंद झाल्यामुळे युजर्स नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. तर  आठवड्याच्या सुरुवातीला जेव्हा फेसबुक बंद पडले, तेव्हा फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम बंद केले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !