MBP Live24 - फेसबुक सेक्शुअल कंटेंट पोस्ट करणाऱ्या खात्यांवर बंदी घालणार आहे. कंपनीने पॉलिसी अपडेट केली असून जर एखाद्या वापरकर्त्याने सेलिब्रिटी, राजकारणी, क्रिकेटपटू आणि पत्रकार अशा पब्लिक फिगर व्यक्तींना लक्ष्य केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
वापरकर्त्याचे प्रोफाइल, पेज, ग्रुप किंवा इव्हेंट कायमचा काढून टाकला जाईल. सोशल मीडियावर अनेक वापरकर्ते बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटपटू आणि राजकारणी यांचे मीम्स तयार करून ते शेअर करतात. आता हे विनोद करणे महागात पडू शकते.
फेसबुकचे ग्लोबल सेफ्टी हेड अँटीगोन डेव्हिस यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. लोकांची प्रतिमा खराब करणारे आणि ऑनलाईन त्रास देणारे, यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
फेसबुकने आपले धोरण बदलून सार्वजनिक व्यक्ती आणि वैयक्तिक यांच्यातील फरक अधोरेखीत केला आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची योग्य अंमलबजावणी करणे शक्य होईल.