धुळे - येथे दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी दरोडा टाकुन एक खून केल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. परिस्थिती तणावपूर्ण होऊन नागरिकांनी मध्यरात्री आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र ही बाब समजताच पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित हे घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनीही संवेदनशीलता दर्शवत झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले. तसेच नागरिकांच्या भावना समजू शकतो, आपल्या घरातील कोणी गेले तर काय वाटेल, हे मी समजू शकतो असे ते म्हणाले. या जिल्ह्यात आल्यापासून एकही गुन्हा असा नाही की आम्ही शोध लावलेला नाही. त्यामुळे यातील आरोपी नक्की शोधून आणू.
जर आम्ही लवकरात लवकर आरोपी शोधून आणले नाही, तर मी नोकरी सोडून देईन, असे चिन्मय पंडित म्हणाले. आणि विशेष म्हणजे त्यांच्या सूचना आणि मार्गदशनखाली धुळे पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करीत अवघ्या दोन तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.