अहमदनगर - स्वरसम्राट व गायकीच्या जगात आपल्या नावाची जगभर ओळख निर्माण करणाऱ्या आदरणीय लता मंगेशकर यांचा वाढदिवस नुकताच आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
दिपा भालेराव, निता माने, डॉ. रेशमा चेडे, सुनील भंडारी, सुनिल हळगावकर, श्रीपाद शहाणे, दिनेश मंजरतकर, विकास खरात, संजय माळवदे, अमीन धाराणी, चाईल्ड गायक आराध्या गायकवाड़ यांनी लताजींची गीते गायली.
'हाय शरमाऊं किस किसको बताऊ, ये रात भीगी भीगी, हम बने तुम बने, हम तुम दोनों जब मिल जायेंगे, याद किया दिल ने पुकार लो, तुझे देखा तो ये जाना सनम, या व असे अनेक ब्लॅक अँड व्हाईटचे १९६० ते आजपर्यंतची नावाजलेली गीते सादर करुन हौशी कलाकारांनी सभागृहाचा माहोल संगीतमय व सुरीला ठेवला.
ग्रुपसाठी लता मंगेशकर यांचे फोटो दिनेश मंजरतकर यांनी स्वत तयार करुन दिले. तर पेंन्सिलचित्र अक्षय वैद्य यांनी रेखांकन करुन दिले. मिठाई वाटप समीर खान, किरण उजागरे, विजय तण्णु, राम गालपेल्ली यांच्या वतीने करण्यात आले.
हौशी कलाकार गायकांना रसिकांनी भरभरुन दाद देत त्यांचा उत्साह वाढविला. सुत्रसंचालनात डॉ. रेशमा चेडे यांनी लताजींबद्दल माहिती दिली. प्रस्ताविक अमीन धाराणी यांनी केले. आभार श्रेयश पवार यानी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुलशन धाराणी, शौकत विराणी, गणेश सब्बन, आबीद खान, राम गालपेल्ली, संजय कुलकर्णी, देवदत शहाणे आदिंनी परिश्रम घेतले.