राज्यात करोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झालेला आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच उत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. दि. २ ऑक्टोबरपासून दिवाळीसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तशी नियमावलीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कोरोना झालेल्या आणि होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालू वर्षी फटाके फोडणे टाळावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. सिनेमागृह आणि नाट्यगृहांसोबतच दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.
नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करु नये, हा उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाच्या इतर नियमांचे पालन करावे, असेही सांगितले आहे.