अच्छा ! तर अशी आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची इच्छा

वर्धा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच मल्टिमाॅडल लॉजिस्टिक पार्कच्या सामंजस्य करारासाठी जिल्ह्यात हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांची मनातली इच्छा बोलून दाखवली.


वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टिमाॅडल लॉजिस्टिक पार्कचा सामंजस्य करार एनएचएलएमएल व जेएनपीटी म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट यांच्यात झाला. यावेळी ते आले होते. 

देशातील पेट्रोल व डिझेल पंप कायमचे नाहीसे व्हावेत, हीच माझी इच्छा आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. 

हाॅटेल सेंटर पाॅइंट येथे झालेल्या कार्यक्रमात जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, एनएचएलएमएलचे सीईओ प्रकाश गौर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस आदी उपस्थित होते.

पेट्रोल-डिझेलचे वाढीव दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या बॅरलवर अवलंबून आहेत. त्यामुळे भाव वाढत आहेत. यावर प्रभावी उपाय म्हणून इथेनाॅलसारखे पर्यायी इंधन आहे, असे गडकरी म्हणाले. 

इथेनॉल हे सर्वाधिक परवडणारे इंधन असून ते विमानातील इंधनासाठीही यशस्वी झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता पर्यायी इंधनाची गरज आहे. 

इथेनॉल, सीएनजी, बायो एलएनजी, इलेक्ट्रिक हे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. या इंधनाचा पर्याय सर्वांना स्वीकारावा लागणार आहे, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !