'या' गाजलेल्या खून खटल्यातील आरोपींची जामिनावर मुक्तता

अहमदनगर - नारायण गव्हाण (ता. पारनेर) येथील बहुचर्चित खून खटल्यातील आरोपी राजेश शेळके व इतर आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा न्यायालयाने दिले. ही माहिती अ‍ॅड. परिमल फळे यांनी दिली आहे.

पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण येथे राजाराम जयवंत शेळके यांचा धारदार हत्याराने ११ जून २०२१ रोजी खून झाला होता. याप्रकरणी सुपा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेत असलेल्या आरोपी यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली होती. 

तपासी अधिकारी यांनी तपास पूर्ण करून, आरोपी राजेश शेळके, संग्राम कांडेकर, अनिकेत कांडेकर यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केलेले आहे. या तपासात राजाराम शेळके यांचा खून पूर्ववैमनस्यातून तसेच पूर्वनियोजित कट करून मयत राजाराम शेळके यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या खटल्यामध्ये सर्व आरोपी यांची बाजू अ‍ॅड.परिमल की. फळे मांडत आहेत. या सुनावणीदरम्यान अ‍ॅड. फळे यांनी आरोपीतर्फे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर सुनावणी होऊन अ‍ॅड. फळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला. 

शेळके याला २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या अर्जाकामी अ‍ॅड. फळे यांना अ‍ॅड. सागर गायकवाड, अ‍ॅड. अभिनव पालवे, अ‍ॅड. प्राजक्ता आचार्य यांचे सहकार्य लाभले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !