मंगल भक्त सेवा मंडळाचे गुरूवर्य राजाभाऊ कोठारी यांना टोळक्याची मारहाण

अहमदनगर - किरकोळ कारणावरून मंगल भक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी गुरुजी यांना युवकांच्या टोळक्याने मारहाण केली. त्यांच्या अनुयायांनाही नऊ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. तसेच एकाचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोतवाली पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री रामचंद्र खुंट परिसरात ही घटना घडली. कोठारी हे त्यांच्या अनुयायांसह कारमधून जात होते. त्यावेळी रस्त्यातच उभे असलेल्या टोळक्याने जाण्यास जागा न दिल्याने व्रजेश गुजराथी यांनी हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने टोळक्याने कोठारी यांना मारहाण केली. 

याप्रकरणी व्रजेश सतीश गुजराथी (रा. दिल्लीगेट) यांनी फिर्याद दिली आहे. टोळक्याने कोठारी व इतरांना शिवीगाळ करून राजाभाऊ कोठारी, प्रशांत अभयचंद सुराणा यांना मारहाण करून जयंत पारीख यांना जमिनीवर खाली पाडले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

कोतवाली पोलिसांनी या फिर्यादीनुसार नऊ जणांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुदैवाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे जमाव पळून गेला. पोलिसांनी तणाव आटोक्यात आला. दरम्यान, कोठारी महाराज यांना मारहाण झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

या टोळीविरूद्ध गुन्हा दाखल

सरवर शेख, जुनेद उर्फ जुन्या, अमन शेख, मुजाहिद बेग, रेहान शेख, फर्मान रफिक शेख (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. झेंडीगेट), वसीम शेख, शेख भाईजान उर्फ दस किलो, आसिफ शेख सिकंदर उर्फ लूल्या (सर्व रा. मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीरपणे जमाव गोळा करुन दहशत निर्माण करणे आदी कायदा कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

भक्तांमध्ये संतप्त भावना

मंगल भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून राजाभाऊ कोठारी हे अनेक वर्षांपासून सामाजिक व धार्मिक कार्य करत आहेत. शहरात त्यांचे असंख्य अनुयायी आहेत. त्यांना मारहाण झाल्याची वार्ता समजताच अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली जात आहे.

शुक्रवारी काढणार मूकमोर्चा

राजाभाऊ कोठारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांचे अनुयायी मूक मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा शुक्रवारी सकाळी १० वाजता आदिनाथ शंकर महाराज चौक, नवी पेठ, येथून सुरू होईल. नगरकरांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी होऊन निषेध नोंदवण्याचे आवाहन सोशल मिडियाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !