मुंबई - अंमली पदार्थविरोधी केसमध्ये जेलममध्येे असलेल्या आर्यन शाहरूख खान (Aaryan Shahrukh Khan) याला आजही जामीन मंजूर झाला नाही. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने यावर निर्णय राखून ठेवला आहे. आता काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हे देखील वाचा - उत्सुकता ! आज तरी आर्यन शाहरुख खानला जामीन मिळेल का.?
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणील सुरुवात झाली आहे. आर्यन शाहरूख खान याचे वकील रोहतगी म्हणाले होते - तरुण मुलांना सुधारण्याची संधी मिळावी. तर ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी अरबाज मर्चंटसाठी युक्तिवाद केला.
मंगळवारी देखील आर्यन खान याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. मात्र एकाच पक्षाची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. आता आज बुधवारी दुसरी बाजू ऐकल्यानंतर आर्यन खानच्या जामीनावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. मात्र, निर्णय होईलच की नाही, याबाबत शंका आहे.
ही शक्यता खरी ठरली - अनेकदा आरोपी आणि सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांंडून झाल्यानंतर त्यांनी संदर्भादाखल दिलेले न्यायनिवाडे अभ्यासण्यासाठी कोर्ट वेळ घेते. त्यामुळे कदाचित असे झाले तर आर्यनच्याा जामीन अर्जावरील सुनावनी आणि निर्णय आणखी काही दिवस लांबवणीवर जाण्याचीही शक्यता आहे.
आज होणार निर्णय
आर्यन खान याच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. या अर्जावर आता न्यायालय गुरुवारी निकाल सुनावणार आहे. त्यामुळे आर्यन शाहरूख खान याच्यासह त्याच्या चाहत्यांनाही आणखी एक दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.