अहमदनगर - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने दिनांक २७ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेराजगार उमेदवार https://rojgar. mahaswayam.in या वेबपोर्टलवर नावनोंदणी करुन 'रोजगार' हा पर्याय निवडावा. या संधीचा लाभ घ्यावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 'जॉब सीकर' हा पर्याय निवडून आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने संकेतस्थळावर प्रवेशित व्हावा.
मुख्य पानावरील पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावामधील 'अहमदनगर ऑनलाईन जॉब फेअर 4' हा पर्याय निवडावा. त्यानंतर 'अहमदनगर' जिल्हा निवडावा. दिनांक २७ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत होणाऱ्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यासाठी उपस्थिती नोंदविण्यासाठी क्लिक करा.
'आय ॲग्री (I agree)' हा पर्याय निवडा. आपल्या पात्रतेनुसार विविध कंपन्यांच्या रिक्त पदाची निवड करुन अप्लाय (Apply) बटनावर क्लिक करावे. मुलाखती ह्या ऑनलाईन पध्दतीने जसे व्हॉटसॲप कॉलिंग, स्काईप किंवा टेलिफोन वरुन घेतल्या जातील.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी केंद्रा समोर, अहमदनगर तसेच ०२४१-२४२५५६६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.