अहमदनगर - नॉव्हेल रिसर्च अकॅडमी, पोंडुचेरी यांच्या वतीने देण्यात येणारा बेस्ट यंग रिसर्चर अवॉर्ड या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कॉलेज ऑफ फार्मसी, विळदघाट, अहमदनगर येथील प्राध्यापक गणेश बरकडे यांची निवड झाली आहे.
हा पुरस्कार दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर झाला. पुरस्कार शिक्षक दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शैक्षणिक व संशोधन क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या युवा संशोधकाला जाहीर करण्यात येतो. प्रा. बरकडे यांचे आत्तापर्यंत १० संशोधन शोधनिबंध प्रकाशित आहेत.
प्रा. बरकडे यांच्या नावावर एक पुरस्कार देखील आहे. तसेच ते प्रा. डॉ. आर. एल. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग या विषयावर पीएच. डी. करत आहेत. या पुरस्काराबद्दल बरकडे यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि संशोधन क्षेत्रामधून कौतुक होत आहे.
याबद्दल संस्थेचे विश्वस्त राधाकृष्ण विखे, शालिनीताई विखे पाटील, संस्थेचे सीईओ खासदार डॉ. सुजय विखे, धनश्री विखे, सचिव लेफ्ट. जनरल डॉ. बी. सदानंदा, संस्थेचे डायरेक्टर डॉ. पी. एम. गायकवाड, डॉ. अभिजीत दिवटे, प्राचार्य डॉ. पी. वाय. पवार, उपप्राचार्य डॉ. आर. एल. सावंत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी प्रा. बरकडे यांचे अभिनंदन केले.