नाशिक - राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात नाशिक परिक्षेत्राच्या उपमहानिरिक्षकपदी ज्येष्ठ अधिकारी बी. जी. शेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी नाशिक परिक्षेत्रात जळगाव व अहमदनगर येथे त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे या परिक्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा त्यांना अनुभव आहे.
राज्य सरकारच्या गृह खात्याने काल रात्री उशीरा ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात नाशिक परिक्षेत्राच्या उपमहानिरिक्षकपदी बी. जी. शेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नवी मुंबईचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) या पदावर काम पाहत होते. आता बदलीवर त्यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे.
प्रतापराव दिघावकर यांची निवृत्ती
प्रतापराव दिघावकर हे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक या पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून हे पद पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. यानंतर आता या पदाचा कार्यभार बी.जी. शेखर हे सांभाळणार आहेत.
अहमदनगर, जळगाव चा अनुभव
साहित्य क्षेत्रात योगदान