मोठा बदल : आता महापालिका निवडणुकीत 'अशी' असेल वॉर्ड रचना, निवडणूक आयोगाचा आदेश

MBP LIVE 24

मुंबई : पुढील वर्षी नाशिक, मुंबईसह राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणुका एकल प्रभाग (वॉर्ड) रचनेनुसारच होतील, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे.


या धर्तीवर वॉर्डरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकांना दिले असून २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे ही रचना करण्यात येईल.

भाजप काळात बहूवॉर्ड पद्धत
यापूर्वी मुंबईत एकल प्रभाग पद्धत होती. मात्र, अन्य महापालिकांमध्ये दोन, तीन किंवा चार वॉर्डींचा एक प्रभाग करून निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती आणि या रचनेचा फायदा भाजपला होईल, असा अंदाज बांधून ती रचना करण्यात आली होती.

महाविकास आघाडी सरकारचा निर्णय

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एकल प्रभाग रचनेच्या आधारे पालिका निवडणुका घेण्याचे ठरले. अधिनियमात तशी सुधारणादेखील केली. थेट नगराध्यक्ष व सरपंच निवडणुका फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आल्या. तो निर्णयही महाविकास आघाडी सरकारने बदलला व निर्वाचित सदस्यांमधून नगराध्यक्ष, सरपंचांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता.

या महापालिका निवडणुकीत अंमलबजावणी होणार

नाशिक, मालेगाव, मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !