आत्ता आत्ता पर्यंत किती छोटे होते हे शहर..
एवढ्यात किती मोठं झालं.
कितीही वर्षे निघून गेली तरी आपल्याला भूतकाळ आत्ता आत्ता पर्यंतच वाटतं असतो..
जीवन ही असेच असते..
आत्ता आत्ता पर्यंत होता..
रात्री बोललो. खुप भरभरून बोलत होता..
हो. आयुष्य फार कमी आहे.
ते जातं कधीं त्याचा पत्ताही लागतं नाही आपल्याला...
बुडबुडा कधीं फुटून जाईल ते कळत देखील नाही,
बुडबुडाच तो…
काय स्थान असणार त्याचं...
हे माझं ते माझं हे करणं सोडून द्यायला हवं ..
इतिहास मरणाऱ्याचा होत नसतो..
तो जगणाऱ्याचा होत असतो...
जगताना इतिहास निर्माण करण्याची ताकद असायला हवी..
सार्वजनिक जीवनात मिळालेलं पद मिरवून घेण्यापेक्षा काही निर्माण करण्यासाठी असतं, हेचं अनेकांच्या लक्षात येतं नाही..
लोकांच्या मिळालेल्या दुवा याचा आनंद, त्याची तृप्ती काही औरच असते..
किती कमावणार जनतेच्या सेवेसाठी मिळणाऱ्या पदामधून..?
अनितीतून मिळालेल्या पैश्यापेक्षा चांगल काही निर्मितीचा आनंद आयुष्यभर तुमची सोबत करीत असतो..
त्याचं सुख कशातही मोजता येणार नाही तुम्हाला..
लोकांच्या घोळक्यातून थोडंसं पूढे जा..
हीच माणसे तुमच्या मागे तुमच्या कुंडलीची धज्जी उडवत असतात...
अन् तुम्हीं मात्र वेगळ्याच भ्रमात असता...
एकांतात रमता यायला हवं...
तिथे तो आनंदी असायला हवा...
जेव्हा तुम्हीं एकटे असता,
तेव्हाच स्वतःशी खरे बोलत असता..
तुमचा आतला आवाज तुम्हाला मग तुमच्या कृत्यांचा हवाला देत असतो..
तुमच्या पूढे शरमेने मान खाली जात असते तुमचीच...
एकांत तुमचा खरा सोबती असतो..
चांगल काहीं केलं तर तुमची पाठ आनंदाने थोपटत असतो...
हीच खरी पूजा आहे..
हीच खरी प्रार्थना आहे..
- जयंत येलुलकर, अहमदनगर