गुड न्युज ! पुणे शिरूर महामार्ग होणार दुमजली

पुणे - शिरुर लोकसभा मतदारसंघातील नगर रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघत आहे. पुणे-शिरुर दरम्यान दुमजली पुलाचा एलिव्हेटेड कॉरीडॉर (६७ कि.मी) व चाकण -शिक्रापूर चौपदरीकरणासाठीचे काम लवकरच पुर्ण होत आहे. 


यासाठीचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजूर केला आहे, अशी माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने या दोन्ही कामांसाठी सुमारे ८२१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

सुमारे ७ हजार २०० कोटी रुपये पुणे शिरुर दरम्यानच्या दुमजली एलिव्हेटेड कॉरीडॉरसाठी तर १ हजार १५ कोटी रुपये तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यानच्या चौपदरीकरणासाठी मंजूर करण्यात आले आहेत. 

आपल्या भागातील पायाभूत विकासाच्या दृष्टीने हा निधी अतिशय महत्वाचा असून या भागातील दळवळण यामुळे गतीमान होणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मनापासून आभार मानले आहेत.

पुणे शिरूर रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्यासाठी रु. २० कोटी मंजूर केले आहेत. बुधवारी (दि. २८ जुलै) सल्लागार (कन्सल्टंट) नेमणुकीची निविदा प्रक्रिया सुरु होत आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरु होऊन ते वेगाने पुर्ण होइल हा विश्वास आहे. 

या रस्त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते व शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकबापू पवार यांच्यासोबत सातत्याने पाठपुरावा केला होता. 

या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून लोकसभा निवडणूकीच्या काळात जनतेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल पडले याचा आनंद आहे, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !