नाशिक : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे
गोदाघाटावर पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे.त्र्यंबकेश्वरसह नाशिक परिसरात संततधार सुरूच आहे.
पावसाची संततधार सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
गोदा घाटाच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गंगापूर धरण 79 टक्के भरले
गंगापूर धरण 79 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून 3000 क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणातून पहिल्यांदाच पाणी सोडले आहे. जिल्ह्यातील 5 धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाणी संकट दूर होण्याची शक्यता आहे.