नाशिक : जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत आज दुपारीन 4 वाजता घोषणा होईल.
कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री यांनी नाशिक जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यासाठी सुचना केली आहे. यानंतर आता पालकमंत्री छगन भुजबळांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आज (ता. 30) संध्याकाळी 4 वाजता प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन भुजबळ परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. यावेळी आढावा घेऊन निर्बंध शिथिलते बाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
दुकाने, हॉटेल्स उघडे ठेवण्याच्या सध्याच्या वेळत बदल करून ती वेळ वाढण्याची शक्यता आहे.