शेवगाव (MBP LIVE 24) :
कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना करण्याकरिता शेवगांव रेणूका नगर येथे युथ विथ अ मिशन मुंबई या सामाजिक संस्थेने 4 ते 12 वयोगटातील लहान मुलांना कोरोना सरंक्षण किट चे वाटप केलेया प्रसंगी यूथ विथ अ मिशन मुंबई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मुत्तूब्रदर, जॉनसन ब्रदर, अभिषेक ब्रदर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण होते. सुत्रसंचालन वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख यांनी केले. यावेळी रविन्द्र निळ, शेख सलीम जिलानी, रमेश खरात, शेख राजूभाई, विशाल ईंगळे, सुरेश निळ, राजू निळ आदी सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहूजन आघाड़ीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका संघटक लक्ष्मण मोरे यांनी केले. हृषिकेश राउत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका संघटक लक्ष्मण मोरे यांनी केले. हृषिकेश राउत यांनी उपस्थितांचे आभार मानले.