गावाने ग्रामसभा घेऊन एक आदेश जारी केला आणि त्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना 25 लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामसभेने जिल्हा सत्र न्यायालयास देखील याची प्रत पाठवली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात गेले असल्याने न्यायालय यावर काय आदेश देते याची उत्सुकता आहे. मध्य प्रदेश मधील बैतूल जिल्ह्यातील शहापूर गावची ही घटना आहे.
MBP LIVE 24
बैतुल : पोलिसांनी पकडून नेलेल्या आरोपीला खुनाची कबुली देण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला. या दबावानंतर दहा हजार रुपये दे म्हणून मागणी केली. या सर्व प्रकाराला घाबरून संशयित आरोपीने घरातील कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. या घटनेने प्रचंड संतप्त आणि आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसभा बोलावली आणि थेट बैतूलच्या जिल्हाधिकाऱ्यांनाच पंचवीस लाखांचा दंड ठोठावला.
दरम्यान, ग्रामसभेला जिल्हाधिकाऱ्यांना दंड करता येतो, की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. परंतु हे धाडस गावकऱ्यांनी दाखवून या देशातील घटना आणि संविधान सर्वोच्च असल्याचे आणि तेवढेच ते सक्षम असल्याचे देखील सिद्ध केले आहे.
स्थानिक ठिकाणच्या एका हत्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून शहापूर या गावातील सियाराम या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हत्येची कबुली दे असे सांगत, पोलिसांनी त्याच्यावर दबाव टाकला. मात्र त्याचा कुठेही हस्तक्षेप दिसत नसल्याचे पाहून पोलिसांनी यातून सुटायचे असेल, तर दहा हजार रुपये दे, अशी मागणी केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
दरम्यान पोलिसांच्या जाचाला कंटाळून सियाराम याने घरातील कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ ग्रामसभा बोलावली आणि हे अजब न्यायदान करून खळबळ उडवून दिली आहे.