वॉशिंग्टन - चीनने अण्वस्त्रांचा साठा वाढवणे चिंतेचा विषय असून चीनने या विषयावर अमेरिकेशी चर्चा केली पाहिजे, असे मत अमेरिकेने व्यक्त केले आहे.
गुरुवारी पत्रकारांशी बोलताना अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, 'असंतुलित शस्त्रास्त्र स्पर्धेचा व्यावहारिक तोडगा काढण्यासाठी चीनने अमेरिकेशी बोलले पाहिजे.'अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने एका अहवालात दावा केला आहे, की चीन आपल्या पश्चिम प्रांतातील वाळवंटात शंभरहून अधिक क्षेपणास्त्र सिलो (क्षेपणास्त्र तळ) तयार करीत आहे. या प्रश्नावर नेड प्राइस म्हणाले की, शस्त्रास्त्रांचे परीक्षण लपविणे चीनला कठीण झाले आहे.