अहमदनगर - जिल्हा न्यायालयात नूतन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून सुधाकर यार्लगड्डा नुकतेच रुजू झाले आहेत. अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. भूषण बर्हाटे यांनी वकिलांच्या वतीने त्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात यार्लगड्डा यांचा सत्कार केला.
यावेळी उपाध्यक्ष अॅड. सुहास टोणे, सचिव अॅड. अमोल धोंडे, अॅड. रियाज शेख, अॅड. सुनिल तोडकर महाराज, विशेष सरकारी वकिल अॅड. सुरेश लगड, केंद्र सरकारचे वकिल अॅड. सुभाष भोर, अॅड. राजेश कावरे, अॅड. जय भोसले, अॅड. विजय केदारे, अॅड. सचिन घावटे आदी उपस्थित होते.
नव्या प्रधान सत्र जिल्हा न्यायाधीशांच्या स्वागताला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजके वकिल मंडळी उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधक नियमावलीमुळे न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ही वेळ न्यायालयाचे कामकाज आता दुपारी २ वाजेपर्यंतच चालणार आहे.