पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रथमच प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय घेतला असून या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना सीईटीसाठी (CET) 20 जुलै ते 26 जुलै या कालावधीत परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तयारी पूर्ण झाली आहे.
परीक्षा वेळापत्रक - सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत.
परीक्षा शुल्क माफ - कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी विषयनिहाय 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जातील. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागेल.
अशी असेल प्रवेश प्रक्रिया
- अकरावीची प्रवेशासाठी CET परीक्षा
इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा
- प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
- गुण – 100
- बहुपर्यायी प्रश्न
- परीक्षा OMR पद्धतीने
- परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी
- कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?
- CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश
- CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य
- त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश
- CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार
सीबीएसई बोर्डाचा निकाल आज ? - सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपणार आहे. सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. सीबीएसईंने तयार केलेल्या 20+80 या फॉर्म्यल्यानुसार दहावीचा निकाल जाहीर होईल प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थ्यांचे 100 गुणांचा मूल्यांकन केले जाईल. या मधील 20 गुण पहिल्या पद्धतीप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनावर दिले जातील. तर 80 गुण नव्या धोरणानुसार दिले जातील. यामध्ये 10 गुण युनिट टेस्ट, 30 गुण सत्रांत परीक्षा तर 20 गुण पूर्वपरीक्षेला दिले जातील.