तर तिनेही वटसावित्रीचं व्रत नक्कीच करावे

सत्यवानाचे प्राण वाचवणारी सावित्री ही प्रतिकात्मक आहे. त्यामुळे व्यसनी, बाहेरख्याली, रोगट, मानसिक छळ करणाऱ्या नवऱ्यासाठी वटसावित्रीची पूजा सक्तीची नसावी. अनेक वेळा असे नवरे त्यांच्या मृत्यूस स्वतः कारणीभूत असतात. त्यात मुलींचा काय दोष ? 


किवा अशाच काही अपवादात्मक स्त्रियांनीही उजळ प्रतिमा राखण्यासाठी तोंड देखले व्रत करू नये. मुख्य म्हणजे बायकोने जर नवर्यासाठी व्रत करायचे तर तेवढ्याच आत्मीयतेने आणि एकनिष्ठ भावनेने नवऱ्याने देखील आपल्या बायकोसाठी व्रत करायला हवे.

प्रत्येक मुलगी ही तिच्या आई वडिलांची राजकुमारी असते. लक्ष्मीचा अवतार असते. जर काही अपघात झाल्यामुळे एखाद्या स्त्रीचा नवरा मृत झाला असेल. सैनिक असेल, किंवा तत्सम काहीही, आणि त्याच्या आठवणी तिच्या जगण्याची शिदोरी असे, तर तिनेही वटसावित्रीच व्रत नक्की करावे.

मला आपल्या परंपरेतील काही चुकीच्या गोष्टी मनापासून बदलाव्या वाटतात. कारण यम, प्राण वाचवणे, या काल्पनिक गोष्टी आहेत. त्यातील अर्थ समजून घेतला पाहिजे. कोणासाठीही न थांबणारी गोष्ट म्हणजे वेळ. ही वेळ अत्यंत महत्वाची असते. तिचे महत्व कळतेच.

तुमच्या आयुष्यातील ही वेळ तुम्ही किती अर्थपूर्ण जगता, किती आनंदी राहता, हे तुमच्यासाठी समाधान निर्माण करणारे आहे. बाकी काळ साक्षी आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो..मानवी उत्क्रांती पाहणारा काळ. अशा अनेक पिढ्यांचा इतिहास पाहिलेला.. नक्की काय म्हणत असावा..?

- डॉ. मानसी पवार (पुणे)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !