अहमदनगर - न्यु आर्ट्स महाविद्यालयातील संज्ञापन विभागातील काही विद्यार्थ्यांनी वृत्तम हि शॉर्टफिल्म बनवली होती, हि शॉर्टफिल्म इंग्लंडच्या LIFT-OFF GLOBAL NETWORK FILM FESTIVAL मध्ये सिलेक्ट झाली आहे.
वृत्तम या शॉर्टफिल्मचे लेखन दिग्दर्शन नेहाल घोडके याने केले आहे. सिनेमॅटोग्राफी अमोल सुरूंगकर, सहाय्यक म्हणून करण वाकडे, संकलन अविनाश चव्हाण व नेहाल घोडके, शुभम घोडके याने प्रॉडक्शन डिझाईन, पार्श्वसंगीत महेश वाघमारे यांनी दिले आहे.
लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क फिल्म फेस्टिव्हल हे इंग्लंड मध्ये गेल्या 11 वर्षांपासून भरत असून इंग्लंड मधील नावाजलेल्या फिल्म फेस्टीवल मध्ये याची गणना केली जाते. याआधीही या विद्यार्थ्यांच्या 'मौज़ू ए सुख़न' आणि 'कुपीड' या दोन शॉर्टफिल्म इटलीच्या एका फेस्टीवल मध्ये सिलेक्ट झाल्या होत्या.
अत्यंत कमी खर्चात, कमी सहकार्यांच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांनी वृत्तम हि शॉर्टफिल्म बनवली असून त्यांना न्यु आर्ट्सच्या संज्ञापन विभागातील विभाग प्रमुख प्रा. संदीप गिर्हे, प्रा. अनंत काळे यांचे मार्गदर्शन लाभले. इंग्लंड मधील या फेस्टीवलचे आयोजनकर्ते जेम्स ब्रॅडली आणि बेन पोहल्मन यांनीही या शॉर्टफिल्मचे कौतुक केले आहे.