अहमदनगर जिल्ह्यातील तायक्वांदोला बगताबगता आज सत्तावीस वर्षे झालीत. तायक्वांदोची जिल्ह्यातील वाटचाल तितकी सोपी नाहीय. आज बरेच खेळाडू अगदी सहज राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतात आणि जिल्ह्यासाठी पदक पटकावितात. असे अनेक खेळाडू जिल्हा संघटनेने राज्याला दिले आहेत. यासर्वा पाठीमागे आहे ती म्हणजे, श्री अविनाश बारगजे सर आणि श्री संतोष बारगजे सर या दोन्ही बंधुंची मेहनत, तायक्वांदो प्रती असलेले प्रेम आणि चांगले खेळाडू घडविण्याची असलेली चिकाटी.
जिल्ह्यातील तायक्वांदो आज आपल्या तिसीकडे वाटचाल करीत असताना श्री संतोष सरांनी लवलेल्या या रोपट्यांचे वटवृक्षामध्ये रुपांतर झालेले आहे. या वृक्षाने आज ग्रामीण भागासह शहरातील अनेक खेळाडू, प्रशिक्षक, संघटक आणि मार्गदर्शकांना आपल्या छत्रछाये खाली समावून घेतले आहे.
खरच खुप भाग्यवान समजतो आम्ही आम्हाला, कारण श्री अविनाश सर जेंव्हा कोरीयातून परत आले तेंव्हा त्यांनी तायक्वांदोचे सर्वात अत्याधुनिक प्रशिक्षण आम्हाला दिले होते. यानंतर जिल्ह्यातील तायक्वांदोने मागे वळून पाहिलेच नाही.
तायक्वांदोची पहिली स्पर्धा जामखेडला आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी त्यावेळच्या जिल्हा संघटकाची परवानगी घेण्यासाठी गोल्यावर आलेला अनुभव आजही डोळ्यात पाणी आनतो. आणि त्यानंतर अहमदनगर ते जामखेड असा दुचाकीवरील प्रवास आठवतो. साधारण रात्री अकरा वाजता (नक्की वेळ आठवत नाही) सर आणि मी नगरमधून जामखेडला परत निघालो होतो.
त्यावेळी खुप कडाक्याची थंडी पडलेली होती. या अशा थंडीत प्रवास करण्याशिवाय अमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. कारण, दुसऱ्या दिवशी स्पर्धेचे उद्घाटन होते. थंडीमुळे प्रवासात अनेक अडचणी आल्या. शेवटी रात्री उशीरा का होइन कसेबसे आम्ही जामखेडला पोहचलो. दुसऱ्या दिवशी स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. स्पर्धाही उत्साहात पार पडली. ही स्पर्धा म्हणजे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी उज्वल भविष्याचे प्रवेशद्वर ठरली. यानंतर ही वाटचाल आज इथपर्यंत येवून पोचली आहे.
- अलताफ कडकाले,
तायक्वांदो खेळाडू