सातारा - जिल्ह्यातील महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार थांबवण्यासाठी पोलिस दलाने योग्य ती पावले उचलावीत जिल्ह्यात महिला आणि मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत. त्यासाठी कोणाचीही गय करु नका, अशा सूचना देत महिला अत्याचार खपवून घेणार नसल्याचा इशारा राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिला आहे.
महिला दक्षता समित्यांचे पुर्नरचना, महिला अत्याचार रोखणे, बालकांबाबतचे अत्याचार रोखणे याबाबत पोलीस विभागाच्यावतीने पथदर्शी प्रकल्प सातारा जिलह्यात राबविण्याबत येणार आहे. त्याचा आढावा आज गृह राज्यमंत्री देसाई यांनी शासकीय विश्रामगृहात घेतला.
महिलांवरील व मुलींवरील अत्याचार रोखण्याबाबत पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्प विविध विभागांचा समावेश घेऊन चांगल्या पद्धतीने तयार करा. अधिवेशन संपात ह्या प्रकल्पाचे रॉल मॉडेल विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना दाखविण्यात येईल.
या बैठकीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी मनोज ससे उपस्थित होते.
हा प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचे दोन ते तीन महिन्यात परिणाम दिसतील. यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करा, अशा सूचनाही गृह राज्यमंत्री देसाई यांनी बैठकीत केल्या.
जिल्ह्यातील महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार थांबविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केल्या होत्या. पोलीसांनी चांगले रोल मॉडेल तयार करावे, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.