नगरमध्ये 'या' भागात आरटीपीसीआर चाचण्या वाढवणार

अहमदनगर - जिल्ह्याच्या काही भागात विशेषता ग्रामीण भागात अद्यापही कोरोना बाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. यावेळी झेडपीचे सीईओ राजेंद्र क्षीरसागर, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, रोहिणी नऱ्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, आदी उपस्थित होते. 

ग्रामसुरक्षा दल आणि हिवरे पॅटर्न प्रमाणे गावात स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी आता अधिक सक्रीय भूमिका बजावण्याची गरज आहे. त्यासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी अशा गावांना थेट भेटी देऊन पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले.

सध्या जरी रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत असली तरी संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, विशेषता सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. 

अद्याप ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत., ही बाब गांभीर्यांने घेणे आवश्यक आहे. गावात बाहेरगावाहून आलेल्या आणि आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने गावात कार्यरत विविध पथकांनी आता सक्रीय भूमिका बजावणे गरजेचे आहे. 

कोरोनामुक्त गाव ठेवायचे असेल तर नियमांचे पालन करावे लागणार असल्याची बाब तालुकास्तरीय अधिकाऱी आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना पटवून द्यावी, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !