राणेगाव (शेवगाव ) - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सरपंच शहादेव खेडकर व उपसरपंच शरद वाघ यांच्या विशेष प्रयत्नातून 70 जणांना करोना प्रति बंधक लस देण्यात आली जिल्हा परिषदेच्या सहकार्यातून सोमवार हा उपक्रम राबवण्यात आला.
या गावामध्ये मागील वर्षी तालुक्यातील पहिला करोना रुग्ण सापडला होता.यानंतर गावात करोनाचा पादुर्भाव वाढू नये, म्हणून सरपंच उपसरपंच यांनी केलेल्या आवाहनाला गावाकऱ्यांनी प्रतिसाद देत करोनाला गावातून हद्दपार केले आहे.
गावात किराणा दुकान असेल स्वस्त धान्य दुकानामध्ये करोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील महिन्यात 20 लसी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यावेळी मच्छिन्द्र खेडकर यांनी पहिली लस घेतली होती.
यावेळी उपलब्ध केलेल्या 70 लसीच्या पहिला डोस रामभाऊ वाघ यांनी घेतला. यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पुंडे, आरोग्य अधिकारी तेजस थोरात, आरोग्य सेविका विद्या शिरसाठ, छाया साबळे, सविता खेडकर, आशा गृहप्रवर्तक भांगरे मॅडम, अनिता कसबे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी मदत केली.