फेब्रुवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यात काही मालिकांचे व सिनेमांचे शुटिंग सुरू होते. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. त्यामुळे सर्व प्रकारचे शुटिंग बंद करण्याची वेळ आली. यामध्ये निर्मात्यांचे तर नुकसान झालेच पण कलाकारांच्याही पोटावर पाय पडला.
कोरोनाची दुसरी लाट तीव्र होत गेली, तसतसे जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्यात आले. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तर लॉकडाऊन घोषित करण्याची वेळी आली. त्यामुळे शुटिंग सुरू होण्याच्या आशाही मावळल्या. शिवाय सिनेमागृहे देखील गेली वर्षभरापासून बंद होती.
नगर शहरातील नाट्यगृहे कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर हळूहळू अटी शर्तींवर खुली झाली. पण दुसऱ्या लाटेच्या धसक्याने तीही बंद करावी लागली. नाट्य चळचळही बंद झाली. मात्र आता सर्व प्रकारचे निर्बंध शिथील करण्यात आले असल्याने नाट्यगृहाचे पडदे उघडयाची आशा निर्माण झाली आहे.