अहमदनगर - सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झालाय. तिच्यासोबत पालक काही तासांपासून वैद्यकीय उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात बसलेत. त्यांची दखल कोणीच घेईना, भाऊ तुम्ही काही करा पण मदतीला या असा एक फोन आला. अन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिच्या मदतीसाठी आली.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अधक्ष परेश पुरोहित यांना त्यांचे मित्र धनेश गांधी यांचा फोन आला. परेश भाऊ देउळगांव फाटा (जि. बीड) या ठिकाणी ६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला आहे. आरोपी ओळखीतला आहे. पीडित मुलीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आणले आहे.
परेश पुरोहित १० मिनिटात सिव्हिल हॉस्पिटलला पोहचले. तर एक आई आपल्या ६ वर्षाच्या चिमुरडीला कुशीत घेउन बसली होती. पण पीडितेला आधी कोरोना टेस्ट करायला सांगितली आहे. ती झालेली नसल्याने पुढील उपचारांसाठी दिरंगाई होत आहे. हे पाहून त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली.
पण त्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नव्हते. त्यामुळे ते तसेच बसून होते. हे पाहून परेश पुरोहित यांनी संतापाने जिल्हा रुग्णालयातील यंत्रणेला धारेवर धरले. मनसेच्या दणक्याने तेथील वैद्यकीय यंत्रणा भानावर आली. अन् त्यांनी तातडीने पीडित मुलीच्या उपचारासाठी धावाधाव केली.
या पीडित मुलीच्या आईने ओल्या डोळ्यांनी पुरोहित यांचे आभार मानले. हे दृश्य पाहून पुरोहित यांचेही डोळे पाणावले. जिल्हा रुग्णालयात उपचारांवाचून कोणाचे हाल होत असतील तर मनविसे ते खवून घेणार नाही, असा इशारा परेश पुरोहित यांनी यावेळी दिला आहे.