नाशिक (MBP LIVE 24 टिम) - शहरातील भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येस केवायसी अपडेटच्या बहाण्याने ऑनलाईन गंडा घालणाऱ्या एका भामट्याने गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सायली सुहास फरांदे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे, की १९ जून रोजी भामट्याने फोन करून सीमकार्ड सुरू ठेवण्यासाठी केवायसी अपडेट करावे लागेल, असे सायली फरांदे यांना सांगितले. त्यासाठी भामट्याने त्यांना अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.
त्यांनतर त्यांना ओटीपी आल्यानंतर ओटीपीचा क्रमांक भामट्याने मागितला. या ओटीपीच्या आधारे भामट्याने सायली यांच्या बँक खात्यातून ३४ हजार ८९१ रुपये परस्पर काढून घेत त्यांना गंडा घातला.