'या' जिल्ह्यात सोमवारपासून सर्व व्यवहार सुरु

अहमदनगर - राज्य सरकारने 'ब्रेक दी चेन' अंतर्गत जारी केलेल्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्याचा समावेश टप्पा क्र. १ मध्ये येत आहे. त्यामुळे सोमवारपासून या जिल्ह्यातील व्यवहार सुरु करण्यात येणार आहेत. अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी शनिवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण यांची आढावा बैठक घेतली. तसेच त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले. जिल्ह्यात बाधित रुग्णांचे प्रमाण घटत चालले आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. 

नगर जिल्ह्याचा गेल्या आठवड्यातील रुग्ण बाधित होण्याचा दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सीजन बेडस वर असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार सोमवारपासून सुरु करता येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आदेश जारी करेल, असे ते म्हणाले.

सध्या राज्य शासनाने ब्रेक दी चेन अंतर्गत जिल्ह्याच्या रुग्ण बाधित होण्याचा दर आणि त्या जिल्ह्यात ऑक्सीजन बेडसची उपलब्धता या निकषांवर काही निर्बंध शिथील करुन व्यवहार पुन्हा सुरु करण्याबाबत निर्देश जारी केले.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आदींचा वापर करणे आवश्यक आहे. पुन्हा बाधितांची संख्या वाढायला लागली तर जिल्ह्यात पुन्हा प्रतिबंध लागू करावे लागतील. त्यामुळे नागरिकांनी याबाबत अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. 

आता लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. केंद्र शासनाकडून पुरेसा लसींचा पुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासन पाठपुरावा करीत आहे. येत्या ६ महिन्यात किमान ८० टक्के लसीकरण करण्याचे प्रयत्न आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७ लाख १५ हजार १४२  व्यक्तींचे लसीकरण केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !