नाशिक (MBP LIVE 24 ):
कोरोना संकटकाळात बंद करण्यात आलेली नाशिकची विमानसेवा 12 जुलैपासून नियमित कार्यरत होणार आहे. अनलॉक नंतर 'अलायन्स एअरलाईन्स'ने दोन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.दिल्ली -अहमदाबाद -नाशिक- दिल्ली तसेच नाशिक- पुणे -बेळगाम- पुणे- नाशिक या दोन विमानसेवा संपूर्ण आठवडाभर नियमित सुरू करण्यात येणार आहे.
त्यासाठी अलायन्स कंपनीच्या वेबसाईट वरून बुकिंग सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊन नंतर मोठ्या अंतरानंतर सुरू होत असलेली ही लांब पल्ल्याची पहिली सेवा आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.