विधीज्ञ अनुराधा येवले यांचा उपक्रम
अहमदनगर - वटपोर्णिमा निमित्त वडाच्या झाडाचे पूजन करण्याबरोबरच शहर वकील संघटनेच्या माजी महिला सचीव अॅड.अनुराधा येवले यांनी वडाच्या झाडांचे रोपण केले. हा उपक्रम जिल्हा न्यायालयाच्या परिसरात राबवला. वकील संघटनेचे अध्यक्ष भूषण बऱ्हाटे यांच्या हस्ते १५ फुट उंचीचे ७ वडाचे झाडे लावण्यात आली.
यावेळी नगरसेवक राजेश कातोरे, सुनील तोडकर, समीर पटेल, निसार शेख, स्वाती वाघ, दिपाली झांबरे, सरिता कोठारी, प्रिया काळे, पोलिस कॉन्स्टेबल पूनम पंडित आदी उपस्थित होते. भूषण बऱ्हाटे म्हणाले, जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतिचा परिसर मोठा आहे.
या परिसराचे सुशोभीकरण व्हावे यासाठी वकील संघटनेने अनेकदा विविध झाडांचे रोपण करून संवर्धन केले आहे. अनुराधा येवले यांनी केलेल्या वाडाच्या मोठ्या झाडांचे रोपण करुन न्यायालयाच्या इमारत परिसाच्या सौंदर्यात भर घातली आहे. भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या वडाचे झाडे लावल्याने निसर्गसंवर्धनाचे कार्य केले आहे.
अनुराधा येवले म्हणाल्या, पुरातन काळापासून चालू असलेल्या रूढी परंपरा आपली भारतीय संस्कृती आहे. सात जन्माचे सौभाग्य मागण्यासाठी वडाच्या झाडाचे पूजन महिला करतात. यावर्षी वडाच्या झाडाचे पूजन करुन सात मोठ्या वडाच्या झाडांचे रोपण करून सामाजिक उपक्रमाने वटपोर्णिमा साजरी केली आहे.