'श्रद्धा आणि सबुरी'चे प्रतीक असणाऱ्या 'साई'च्या नावे प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारे सबुरी न ठेवता सर्वसामान्यांची अमर्याद लूट 'बोगस बेडूक'ने केल्याने तो पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे. कायदेशीर कुठलाही परवाना न घेताच इंग्रजी दवाई विक्रीचा उद्योग करत सर्वसामान्य लोक, शासन व सरकारची फसवणूक बेडकाने केली. तसेच 'साई'च्या नावाने अव्वाच्या सव्वा बिले घेऊन सर्वसामान्यांना लाखो रुपयांचा गंडा घालुन बेडूक साळसूदपणाचा आव आणत असल्याने 'शेववाडी'कर चांगलेच संतापले आहेत. 'त्या' विनापरवाना 'इंग्रजी दवाई' विक्री आणि 'बोगस बिलां'ची चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी फसवणूक झालेल्या लोकांनी संबंधित विभागाकडे केली आहे. विशेष म्हणजे बेडकाच्या 'त्या वेळच्या' काही सहकाऱ्यांनीच याचा भांडाफोड केला आहे. तसे पुरावे देखील दिले आहेत. चला तर मग आजच्या गोष्टीतून पाहू की बेडकाने कसा घातला हा गंडा.
'साई' केंद्राचा गोलमाल
गावा बाहेर 'मंगला' च्या जागेवर ' साई' केंद्र उभारून लोकांना गंडा घालायची गोलमाल आयडीया ची कल्पना बोगस बेडकाने लढवली. काही साथीदारांना बरोबर घेऊन ही बोगसगिरी सुरू केली. म्होरक्या बेडकाने 'मलाई' स्वतःलाच मिळेल याची पुरेपूर काळजी घेतली. त्यासाठीच या केंद्रात परवानगी शिवाय 'इंग्रजी दवा' खाना देण्याचे काम स्वतःकडे ठेवले. या काळात बोगस बिले आणि विनापरवाना दवाई विकून शेकडोंची लूट करून आपला गल्ला भरण्याचे काम बेडकाने केले.
विनापरवाना दवा विक्री
इंग्रजी दवा विक्री व साठा करण्याचा अधिकार केवळ परवानाधारक दुकानदारासच आहे. त्यासाठी राज्याच्या 'दवाई' विभागाकडून (एफडीआय) दवा विक्री परवाना' घेणे बंधनकारक आहे. मात्र, असा कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना बेडकाने मोठ्याप्रमाणात बेकायदेशीर दवा विक्री केली. स्वतःचाच 'दवा' -खाना असल्याने 'पिडितां'ना विनाकारण गरज नसलेल्या वाढीव दवा घ्यायला भाग पाडले. मात्र, हा 'दवा' -खानाच बेकायदेशीर होता. बेडकाने आपल्या दुसऱ्या केंद्रातून दवा आणुन बेकायदेशीर पणे येथे विकल्या. अशा पद्धतीने पीडित आणि शासन या दोन्हीं ची फसवणूक केली.
अव्वाच्या सव्वा बेकायदेशीर बिले
'साई'च्या नावे 'सेवा' देतो असे 'पिडितां'ना भासवून 'मेवा' खायचा गोरखधंदा बेडकाने केला. त्यावेळी शासनाने ठरवून दिलेले 'बिलाचे नियम' पाळण्यात आले नाहीत. 600 रुपयांची किट बाराशे, पंधराशे रुपयांना लावण्यात आलेली आहे. अनेक गोष्टींमध्ये वाढीव बिल लावून एका पीडितांमागे हजारो रुपयांची लूट करण्यात आली. या काळातील हजारो पीडितांच्या मागे मिळून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
बिलाची हेराफेरी आणि धूळफेक
बोगस बिले देऊन मोठ्या प्रमाणात 'हेराफेरी' करून पीडित, शासन आणि सरकारच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली आहे. 'पीडितां'ना इलाज आणि दवा याचे वेगळे बिल देणे आवश्यक होते. मात्र एकाच बिलात सगळं भागविण्यात आले. दवा परवाना नसल्याने त्याचे स्वतंत्र कायदेशीर बिल देणे टाळण्यात आले. 'दवा'च्या रकमेत अनेक हेराफेरी करण्यात आल्या आहेत. तसेच इतर वस्तूंची अव्वाच्या सव्वा बिले लावण्यात आले आहे. एकूणच आधीच अडचणीत असलेल्या पीडितांची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली आहे.
सहकाऱ्यांमुळे 'साई'च्या नावे
खाल्लेल्या 'मेवा'चे गुपित उघड
'साई'च्या नावाने लूट झालेले अनेक पीडित एकत्र आले आहेत. त्यांना दिलेल्या बोगस बिलांची पडताळणी जबाबदार ऑडिटरने केली असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. याचा पूर्ण अहवाल एकत्र करून या लुटीस लवकरच न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. त्यामुळे 'साई'च्या नावाने सेवा करण्याचे भासवून प्रत्यक्षात पीडितांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करून बेडकाने खाल्लेला 'मेवा' आता बाहेर येणार आहे. बेडकाने ही लूट कशी केली ही बाब त्याच्या 'त्या' कृत्यात सहभागी काही सहकाऱ्यांनीच समोर आणली, हे विशेष. दवा विक्रीचा 'गोरखधंदा' बेडकानेच कसा केला याचे अनेक पुरावे त्यांनी दिलेत. शिवाय याचे 'ऑडिओ, व्हिडीओ' रेकॉर्डिंग देखील उपलब्ध आहेत.
क्रमशःआजच्या गोष्टीची शिकवण :
१. बुराई का फल हमेशा बुरा होता है !
२. बेकायदेशीर कृत्यांना कायद्याने चाप बसतोच !