नवी दिल्ली - टीका होत असूनही, भारतीय मीडिया स्वतंत्र आणि शक्तिशाली आहे, परंतु त्याच्या विश्वासार्हतेबद्दल धारणा कमी झाली आहे. अशी खंत ज्येष्ठ पत्रकार आणि एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आलोक मेहता (पद्मश्री) यांनी व्यक्त केली आहे.
भारतातील बातमीची सत्यता कमी झाली आहे. विश्वासार्हता डागाळली गेली आहे. बातमीचे विश्लेषण संपादकीय वर सोडले पाहिजे. बातमीदारी ही तथ्य आधारित असली पाहिजे. भारतातील प्रत्येकाला या वृत्तावर भाष्य करायचे आहे. बातमी विश्लेषण संपादकीयवर सोडले पाहिजे, पण या सीमा तोडल्या आहेत
आज प्रत्येकजण बातम्यांवर कमेंट करत आहे. रिपोर्टर बातम्यांवर भाष्य करीत आहेत आणि बातम्या आणि विश्लेषणामील दरी खंडित झाली आहे. म्हणूनच मिडियाला त्याची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडता येत नाहीय. कोरोनामुळे माध्यमांसमोरील आव्हानेही बदलली आहेत, असे मेहता म्हणाले.
गव्हर्नन्स नाऊचे एमडी कैलाशनाथ अधिकारी यांच्याशी नुकत्याच झालेल्या संभाषणात आलोक मेहता बोलत होते. यावेळी माध्यमांना पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे त्यंनी नमूद केले.