अहमदनगर - महाराष्ट राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळावर कवी प्रा. डॉ. संतोष पद्माकर पवार आणि शिक्षक भाऊसाहेब चासकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.
या मंडळावर २६ सदस्यांची पुढ़ील तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी सर्व नियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले आहे.
भ्रमिष्टाचा जाहीरनामा, पिढीपेस्तर प्यादेमात या कविता संग्रहामुळे परिचित असलेले नव्वदोत्तरी मराठी कवितेतील महत्त्वाचे कवी संतोष पद्माकर पवार यांचा ‘बहादूर थापा आणि इतर कविता’ हा नवा कवितासंग्रह मराठीतील वेगळा ठसा आहे.
या समितीत डॉ. भिमराव उल्मेक, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अरुण भोसले, राहुल देशमुख, डॉ. प्रभाकर देव, सतिश आळेकर, हेमंत राजोपाध्ये, सुबोध जावडेकर, आसाराम लोमटे, डॉ. रविंद्र रुक्मिणी रविंद्रनाथ, निखिलेश चित्रे, डॉ. प्रकाश पवार, शर्मिला फडके, डॉ. प्राची देशपांडे, प्राची दुबळे, डॉ. सदाशिव पाटील, प्रा. संजय ठिगळे, डॉ. कृष्णदेव गिरी, डॉ. विशाल इंगोले, डॉ. निंबा देवराव नांद्रे, मनिषा उगले, भाऊसाहेब चासकर, उल्हास पाटील यांची नियुक्ती झाली आहे. या सर्वांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.