महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात देशातील १ हजार ८४६ जणांचा प्रतिसाद

मुंबई - महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहामध्ये देशभरातील एक हजार ८४६ स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे. यापैकी विजेत्या स्टार्टअप्सना १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश मिळणार आहेत. राज्यातील विविध शासकीय खात्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाला चांगला प्रतिसाद मिळाला असून देशभरातील १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी नोंदणी केली आहे. 

आरोग्यविषयक ३२०, शेतीविषयक २५२, शिक्षणविषयक २३८ अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पना सादर झाल्या आहेत, अशी माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. तरुणांमधील नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणे, देशातील उद्योजकीय परिसंस्थेला चालना देणे हा सप्ताह आयोजित करण्याचा उद्देश आहे

कृषी, शिक्षण व कौशल्य, शासन, आरोग्य सेवा, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात देशभरातील स्टार्टअप्सनी अर्ज केले. २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून १ हजार ८४६ अर्ज प्राप्त झाले. महाराष्ट्रातून सर्वाधिक ९४७ अर्ज प्राप्त झाले आहेत. 

कर्नाटक २०२, दिल्ली ८७, गुजरात ५४, केरळ ६४, मध्य प्रदेश ३४, तामिळनाडू ८९, तेलंगणा ५६, उत्तरप्रदेश ७५, राजस्थान ३७, हरयाणा ३२  याप्रमाणे विविध २७ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील एकूण १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे.

विजेत्या स्टार्टअपला तब्बल १५ लाखांपर्यंत कार्यादेश मिळणार असल्याने अनेक स्टार्टअप उत्साहाने यात सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्रातून सर्वाधिक ३२२ अर्ज पुण्यातून आले आहेत. तर मुंबई २१२, मुंबई उपनगर ७०, औरंगाबाद १९, कोल्हापूर १३, नागपूर ४२, नाशिक ५२, पालघर १३, रायगड २३, ठाणे ९७ याप्रमाणे विविध जिल्ह्यांमधून अर्ज प्राप्त झाले आहेत.

आरोग्यविषयक ३२०, कृषिविषयक २५२, शिक्षणविषयक २३८, गव्हर्नन्सविषयक ७२, कौशल्यविषयक ९४, स्मार्ट पायाभूत सुविधाविषयक १७६,  परिवहनविषयक १२६, शाश्वत हरित ऊर्जाविषयक ५८, घनकचरा व्यवस्थापनविषयक ११०, पाणी व्यवस्थापनाबाबत ५१ तर इतर विविध विषयांबाबत ३४९  अर्ज आहेत

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !