अहमदनगर - कोविड जागतिक महामारीत अनुसूचित जातीच्या कुटूंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्या कुटूंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी ‘सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ढ इनडिव्हीज्युअल्स फॉर लाईव्हलीहूड अॅन्ड इंटरप्राईज’ (SMILE) ही कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. या योजनेत प्रकल्प मुल्य रुपये 1 लाख ते 5 लाखापर्यंत असणे अपेक्षित आहे.
यात एन.एस. एफ.डी.सी. सहभाग 80 टक्के व भांडवली अनुदान 20 टक्के असे आहे. व्याज दर 6 टक्के प्रमाणे असून परतफेडीचा कालावधी 6 वर्षे आहे. कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे 15 जून 2021 पर्यंत मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीतील (एससी) कुटूंबातील व्यक्तीने माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा https://forms.gle/7mG8CMecLKnWGt6K7 ह्या लिंकवर दिनांक 30 जून 2021 पर्यंत भरावी.
या योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी पात्रता
- अर्जदार अनुसूचित जातीतील असावा.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाखपर्यंत असावे
- अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या कुटूंब प्रमुखाच्या कुटूंबातील सदस्य असावा.
- कुटूंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक
- मृत व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी.
- मृत कुटूंब प्रमुखाची मिळकत कुटूंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असावी
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- महानगर/नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र.
- स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती
- एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास
- गटविकास अधिकार्यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र
अर्ज कसा कराल ?
- मयत व्यक्तीचे नाव व पत्ता,
- आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (3 लाखापर्यंत),
- कोविड-19 मुळे मृत् व्यक्तीचा मृत्यूचा दाखला.
- रेशनकार्ड, वयाचा पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक