लांडग्याची 'तोतयागिरी' उघड : पत्रकार बनून व्यावसायिक, अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना धमक्या, खंडणी वसुली

पापांचा घडा भरलेल्या भामट्या लांडग्याची वाटचाल फसवणूक, चोरी, धमकवणे, खंडणी, लफडेबाजी, अत्याचार ते आता थेट हद्दपारीकडे सुरू झाली आहे. गेल्या 20 वर्षात अनेकांची फसवणूक, विविध संस्थामध्ये फसवणूक, तोतया पत्रकार म्हणून वावरणे, धमकावून खंडणी मागणे, तसेच पोलीस, महसूल, नगरपरिषद आदी प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळणे असे अनेक 'कांड' करणाऱ्या  या 'भामट्या लुटारू'ला गावातुन हद्दपार करण्याचा चंग बांधून सर्वच एकवटलेत. 


ज्यांची ज्यांची फसवणूक, लुबाडणूक झालेले, ज्यांना फोनवरून धमकावलेय, 'रामा'च्या जागेवर राहणारे, ज्यांना खंडणी मागितली असे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्यासह पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन लांडग्याच्या 'हद्दपारी'शिवाय थांबायचे नाही, असा निर्धार केलाय..... अनेक पुरावे एकत्र केलेत... त्यामुळे समाजासाठी 'घातक' बनलेल्या या सराईत गुन्हेगार लांडग्याची हद्दपारी होणार ही 'काळ्या दगडावरची पांढरी रेष' आहे.

तोतयागिरी उघड
अनेक गंभीर गुन्हे करून सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या भामट्याची 'तोतयागिरी' देखील आता उघडी पडलीय. फसवणूक, चोरी, लुबाडणूक केल्याने भामट्या लांडग्याला 'विश्वासघातकी' व घातक म्हणून पंचक्रोशीत कोणी जवळ करेना, काम देईना. म्हणून भामट्याने पत्रकाराचे सोंग घेतले आणि गावभर ब्लॅकमेलिंग करत फिरायला लागला. पण, वाघाची कातडी पांघरल्याने 'पिसाळलेला कुत्रा' थोडीच वाघ होतोय. गावात धमकवणे, ब्लॅकमेलिंग करणे, खंडणी मागणे असे 'कांड' सुरू करून गावाची शांती भंग केल्याने त्रासलेल्या काहींनी याच्या खोलात जायचे ठरवले. नेहमी समाजहितासाठी लढणाऱ्या 'बब्बर शेर'कडे हे प्रकरण गेले. खोलातील चौकशी नंतर हा 'तोतया पत्रकार' असल्याचे उघड झालेय. सर्व पुरावे समोर आलेत. 'व्हाट्सएप'च्या माध्यमातून अनेकांना धमकावून खंडणी घेणाऱ्या या तोतयाची आता पूर्ण 'पोलखोल' झालीय. या प्रकरणी अनेकजण कायदेशीर दाद मागून गुन्हे दाखल करणार आहेत. त्यामुळे तोतयाची ही फेसबुकगिरी आता बंद होणार आहे.




'ग्रुप'मधून पलायन
निव्वळ 'व्हाट्सएपगिरी' करून पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या या भामट्याची लपवलेली 'तोतयागिरी' आणि 'गुन्हेगारी पार्श्वभूमी' उघड झाल्याने इज्जतीची लखतरे गावाच्या वेशीवर टांगली गेली. यानंतर 'बब्बर शेर'च्या धाकाने या लांडग्याने चक्क अनेक 'ग्रुप'मधून पलायन करत शेपूट घालून थेट धूम ठोकली. त्याचा हा पळपुटेपणा पाहून गावकऱ्यांना हसू अनावर झाले. अनेकांनी 'लांडगा पळाला' असे म्हणून हा आनंद साजरा केला.

'ठाण्या'तील चिरीमिरी
पत्रकारितेचा मुखवटा घेऊन मिरवणाऱ्या या 'तोतया'ने गावातील ठाण्यात घुसखोरी केली आहे. त्यासाठी तेथील ठाणेदार आणि शिपायांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. ठाण्यातील वावर वाढवला. यानंतर खुलेआम स्वतःची 'चिरीमिरी' सुरू केली. येथे येणाऱ्या वाद-विवादांमध्ये मध्यस्थी करून थेट पैसे उकळायला सुरुवात केली. जसे, एका मुलाला 'फुगे' शिपायाने पकडून आणले. या मुलाच्या आई-वडिलांना धाक दाखवून तोतया लांडग्याने पाच हजार रुपये उकळले. यातील एक हजार 'फुगे'ला दिले आणि चार हजार घेऊन भामटा लांडगा पसार झाला. नंतर चौकशीत 'फुगे'ना कळले की सगळं आपण केलं आणि चार हजार घेऊन लांडगा पळाला. अशा अनेक घटना पुराव्यांसह समोर आल्याने या तोतयाची ठाण्यातील खुलेआम वावर, चिरीमिरीचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. हा तोतया ठाण्यात कुठल्या अधिकाराने खुलेआम वावरतो, चिरीमिरी घेतो या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 'जिल्हा साहेबां'कडे दाद मागितली जाणार आहे. आता 'तोतया' ठाण्यात, विभागीय कार्यालयात घुसला की त्याला फोटो, व्हिडीओत टिपण्यासाठी अनेक कॅमेरे सज्ज 
'प्रशासकीय' खंडणी
प्रशासनातील महसूल, पाटबंधारे, बांधकाम विभाग, वनविभाग, पंचायत समिती, शिक्षण विभाग, कृषी विभाग, नगरपरिषद आदी ठिकाणी या भामट्या तोतयाचा खुला संचार आहे. येथेही 'ठाण्या'सारखेच चिरीमिरी चे गोरखधंदे सुरू आहेत. येथील अधिकारी, कर्मचारी यांना देखील हा तोतया बेकायदेशीर पणे धाकात घेतो आणि खंडणी उकळतो. नुकतेच'परिषदे'च्या एका ठेकेदाराला या भामट्या तोतयाने थेट 50 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. 'भीक नको पण कुत्र आवर म्हणून' 5 हजार रुपयात प्रकरण मिटले.

'राम-राम' घालून मागतो भीक
भामटा लांडगा पिसाळलेल्या कुत्र्यागत कुठं 'हाड' मिळतंय का याचा वास घेत गावभर बेवारसागत फिरत असतो. रस्त्याने चालताना लोकांना रामराम घालून  50-100 रुपये मागत फिरतो. बाजार भरायचाय, किराणा घ्यायचाय, चहापत्ती, तेल संपलय अशी कारणे देतो. बरं मदत म्हणून घेतलेले पैसे अनेकदा मागूनही कधीही हा भामटा परत देत नाही. या भु'रटेगिरी'ला गावकरी पुरते बेजार झाल्याने हा भामटा तोतया समोरून दिसताच रस्ता बदलतात.

व्यावसायिकांना धमकावणी
गावात 'रामा'च्या जागेवर पोट भरणाऱ्या व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागण्याचे काम हा 'तोतया' सर्रासपणे करतोय. यातून लाखो रुपये या भामट्या तोतयाने उकळलेत. कष्ट करून पोट भरणारे हातगाडीवाले, छोटे व्यावसायिक यांना पत्रकारितेचा धाक दाखवून हा तोतया लुबाडतोय. 'तोतया'च्या नेहमीच्याच त्रासाला वैतागल्याने यातील अनेकजण पुराव्यासह गुन्हे दाखल करण्यासाठी आता पुढे आलेत. भामट्या लांडग्याची 'तोतयागिरी', गुन्हेगारी उजेडात आल्याने आर्थिक व मानसिक छळवणूक, पिळवणूक झालेले 'त्रस्त' लोक संतापून पुढे येऊन पुरावे देत आहेत....
क्रमशः

आजच्या गोष्टीची शिकवण :

1. कायदे मोडणारे, गुन्हेगार, यांचे दिवस भारतातच

2. अडचणीत गाठून लूट केलेल्या सर्वसामान्य लोकांचा तळतळाट लागतोच !

3. भगवान के घर देर है, अंधेर नही !




buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !