शेवगाव (MBP LIVE 24 टीम) :
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत वाढदिवसाच्या हार, तुरे, सत्कार या खर्चाला फाटा देऊन शहरातील कोव्हीड सेंटरला 21 हजार रुपयांच्या रुग्णउपयोगी वस्तू राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते कमलेश लांडगे यांनी वाढदिवसानिमित दिल्या.शेवगांव शहरातील त्रिमूर्ती कोविड सेंटर, डॉ. आंबेडकर वसतिगृह कोविड सेंटर, शेवगांव ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर, स्व. मारूरतराव घुले पाटील कोविड सेंटर आणि स्व. गोपीनाथजी मुंढे कोविड सेंटर या सर्व ठिकाणच्या रुग्णांना बिस्कीट खोकल्याची औषधे फळ आणि पाणी बॉक्स, अशी २१ हजार रुपयांची मदत कमलेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित करण्यात आली.
आदर्श पायंडा पाडत सढळ हाताने रुग्णांना मदत दिली. यावेळी नोडल अधिकारी शैलजा राऊळ, तुफेल मुलानी, वहाब शेख, समीर शेख, रोहन साबळे, संतोष जाधव, कृष्णा सातपुते, शाहरुख शेख, गोविंद किडमिंचे, संदीप हुशार संदीप काथवटे, डॉ. पुष्पक शहाणे, शुभम मासाळ, अभिजीत देशमुख, शोएब शेख आदी उपस्थित होते.
कमलेश लांडगे यांच्या या कामाबद्दल नरेंद्र घुले, शेखर घुले, पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले यांनी समाधान व्यक्त केले.