पैशांच्या हव्यासापायी 'बेडूक'च्या अतिरेकामुळे बळी पडलेल्याचे नातेवाईक, जीवावर बेतलेले पीडितांचे नातेवाईक यांचा संताप सध्या अनावर होत आहे. उद्रेक झाल्याने या गल्लाभरू बेडकाला रोज त्यांची शिव्या-लाखोली खावी लागत आहे. शाप देऊन अनेकजण भरपूर चोप देत आहेत. त्यामुळे अनेकदा धूम ठोकून उड्या मारत धंद्यावरून त्याला पळून जावे लागत आहे. हे आता नित्याचेच झाले
गल्ला भरूचा लोकांच्या जीवाशी खेळ
'बेडूक' 'झाडपाला' द्यायचे सोडून भलतीच विषारी, घातक 'दवाई' देण्याचे काम सर्रास करतोय. लोकांच्या जीवाशी खेळणार हा गोरखधंदा अनेक कायदेशीर परवानगी झुगारून, ज्ञान नसताना त्याने सुरू केलाय, हे विशेष. हा बेकायदेशीर धंदा अनेकांच्या जीवावर बेतत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. मात्र, गल्ला भरण्याच्या मागे लागलेला बेडूक लोकांच्या जीवाची परवा करायला तयार नाही. त्याला फक्त हवाय अमाप पैसा.लाखोंची लूट
बोगस परवानग्यावर 'बेडूक' सर्व गोलमाल करत आहे. अनेक सर्वसामान्यांना रोज लाखोंचा गंडा घालून काहींना पाकिटे वाटत आहे. तो करत असलेल्या कुकर्माकडे दूर्लक्ष करण्यासाठी काहींना बिदागी दिली जात आहे. लोकांच्या 'शवा'वर हे गल्ला भरत आहेत. अडलेल्याना लुटून लाखोंची माया जमा केली जातेय.
कायदेशीर सेवा कुठाय?
बेकायदेशीर पणे लाखोंनी पैसे उकळले जात आहेत, मात्र त्या बदल्यात योग्य, कायदेशीर 'सेवा' दिली जात नाही. कुठल्याही प्रकारचे ज्ञान व परवानगी नसताना लोकांच्या जीवाशी खेळण्याचा 'उद्योग' अविरतपणे सुरू आहे. केवळ कागदावर सेवा आहेत मात्र त्या देणारे 'तज्ञ' नाहीत. अनेक तज्ञ केवळ जाहिराती पुरते आणि दिशाभूल करण्यासाठी आहेत. प्रत्यक्षात मात्र, यापैकी काहीही नाही. सर्व 'अनाडी' मंडळी लोकांवर प्रयोग करत आहेत. यांच्या प्रयोग, गंभीर चुका लोकांच्या जीवावर बेतत आहेत.
एव्हढया मृत्यूचे गूढ काय?
केवळ तज्ञ असल्याचे सरकार दरबारी दाखवून लायकी नसलेले लोकांवर प्रयोग करत आहेत. त्यामुळे अयोग्य ढोस, अयोग्य सेवा लोकांना दिली जात आहे. गरज नसताना दिलेले ओव्हरढोस लोकांच्या जीवावर बेतत आहेत. यंत्रणा सांभाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नाही. दहा लोकांचे काम एकावरच भागविले जात आहे. त्यामुळे अनेकजण 'गुदमरून' मरत आहेत. मात्र, हे मृत्यू दुसऱ्याच नावाने खपविले जात आहेत.
संतापातून मिळतोय 'चोप'
लोकांच्या जीवाशी खेळत असल्याने त्यांचे मृत्यू होत आहेत. चालत, बोलत आलेले ठणठणीत लोकांना बेडकाच्या त्रुटींमुळे आपले प्राण गमवावे लागत आहे. ही बाब लोकांना कळत असल्याने आपले जिवलग गमावलेले लोक संतापातून बेडकाला चांगलाच चोप देत आहेत. नुकतेच आपले जिवलग गमावलेल्या एकाने बेडकाला धु-धु धुतला. यातून वाचण्यासाठी गुन्हेगार बेडूक थेट पळ काढत आहे. त्यामुळे बेडूकचे तोंड काळ झालं आहे. याची चर्चा पंचक्रोशीत चवीने होताना दिसत आहे.