मुंबई - कोरोना संकटात नोकरी, कामधंदा गमावल्याने पालकांकडून शिक्षण शुल्क भरण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुलर विद्यार्थी शिकत असलेली ऑनलाईन शिक्षणाची लिंक कापलेल्या शाळांना नोटिसा बजावल्या जातील, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.
मागील काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाकडून विभागीय शुल्क नियामक समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, या समितीने अद्यापही कामकाज सुरू केलेले नाही. कोरोनामुळे बहुसंख्य पालकांचे रोजगार गेले असून, अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
अशा पालकांना शुल्कामध्ये सवलत देण्याबाबत शाळांना राज्य सरकारने निर्देश द्यावेत, अशी मागणी या शिष्टमंडळाने गायकवाड यांच्याकडे केली.