गुड न्यूज... एक्सपायर्ड ड्रायव्हिंग लायसन्स बाबत सरकारने घेतला 'हा' निर्णय

नवी दिल्ली (MBP LIVE 24) :

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतीच एक ॲडव्हायझरी जारी केली आहे. त्यानुसार एक्सपायर्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा एक्सपायर्ड RC सोबत वाहन चालवणाऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत सूट दिली जाणार आहे. तसेच राज्याच्या परिवहन विभागांना अशा चालकांचे चालान न कापण्याचे निर्देश दिले आहेत.


कोरोना संकट काळात विविध राज्यांत कठोर निर्बंध लागू करण्यात आले. जरी परिस्थिती हळूहळू सामान्य स्थितीत परत येत असली, तरी धोका अद्याप संपलेला नाही. हे लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. जेणेकरून लोकांचा प्रवास सोयीस्कर होईल.

सर्व प्रकारच्या परमिटची वैधता वाढविली : वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राव्यतिरिक्त वाहन फिटनेस प्रमाणपत्राची वैधता आणि सर्व प्रकारच्या परमिटची वैधतादेखील वाढविण्यात आली आहे. "सद्य स्थितीकडे पाहता, ज्या कागदपत्रांची वैधता लॉकडाऊनमुळे वाढवली जाऊ शकत नाही आणि जी १ फेब्रुवारी २०२० रोजी संपली आहे किंवा ३० सप्टेंबरपर्यंत संपेल त्यास ३० सप्टेंबरपर्यं वैध मानली जातील," असे यात नमूद करण्यात आले आहे.

विना ड्रायव्हिंग लायसन्स सूट नाही
सरकारने गेल्या वर्षी ३० मार्च, ९ जून, २४ ऑगस्ट, २० डिसेंबर आणि यावर्षी २६ मार्च रोजी कागदपत्रांची वैधता वाढवली होती. दरम्यान, यामध्ये PUC साठी सूट देण्यात आली नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. ज्या लोकांना पहिल्यांदा लर्निंग किंवा परमनंट लायसन्स घ्यायच नसेल त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही आरटीओ मध्ये लाईनमध्ये उभे राहू नये असे आवाहनही सरकारने केले आहे. दरम्यान, विना ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवण्यावर कोणत्याही प्रकारची सूट नसल्याचे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. विना लायसन्स गाडी चालवल्यास पकडले गेल्यानंतर ५ हजार रूपयांचे चालान कापले जाणार आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !