दिलासा ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भांत महत्वाचा खुलासा

मुंबई (MBP Live24) - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भांत एक दिलासादायक रिपोर्ट समोर आला आहे. देशात तिसरा लाट येण्याची शक्यता फार कमी आहे, असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेसंदर्भात ICMR आणि Imperial College लंडनने एक संयुक्त रिपोर्ट तयार केला आहे.


देशात हाहाकार माजवणारी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चर्चा होताना दिसत आहे. मात्र, याबाबत ICMR आणि Imperial College च्या संयुक्त रिपोर्टमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार फक्त चार कारणांमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येवू शकते.

कोरोना लाटेचे पहिले कारण म्हणजे ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही. लस न घेतल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती फार कमी होते. दुसरे आणि धक्कादायक कारण म्हणजे  व्हायरसचा नवा व्हेरिएन्ट. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएन्ट आल्यास त्याचा रोगप्रतिकार शक्तीवर फार गंभीर परिणाम होवू शकतो. 

तर तिसरे कारण म्हणजे, कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएन्ट आल्यास  तो जुन्या व्हेरिएन्टच्या तुलनेत अधिक पसरू शकतो. चौथ कारण म्हणजे होत असलेले अनलॉक. अनलॉकमुळे लोक रस्त्यांवर गर्दी करत आहेत. या चार कारणांमुळे कोरोना पुन्हा तिसऱ्या लाटेच्या रूपात हाहाकार माजw शकतो असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !