'अवकाळी' च्या रूपाने सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. खरंतर पावसाळा सुरू झाला, की 'बेडूक' बिळातून बाहेर पडतो आणि डराव-डराव करत उड्या मारत फिरतो. मात्र 'तोतया लांडग्या'ला दिलेली 'सुपारी' अंगलट आल्याने ऐन पावसाळ्यातही पापी बेडूक' बिळात जाऊन लपून बसलेय. मात्र, 'गुप्त ऑपरेशन'द्वारे समोर आलेल्या अनेक 'पुराव्यां'च्या आधारे 'तोतया लांडगा', 'कुख्यात गुन्हेगार' आणि 'मास्टरमाइंड बेडूक'ही कायद्याच्या कचाट्यात चांगलाच अडकला आहे. स्वतःच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे आधीच अनेक कारवायांना तोंड देणाऱ्या पापी बेडकाला या नव्याने केलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे तोतयागिरी करणाऱ्या लांडग्याची तडीपारी आणि पापी बेडकाची जेलवारी निश्चित झाली आहे.
बेडकाच्या पापांचा घडा
जडिबुटी विकण्याऐवजी बेडकाने बेकायदेशीरपणे भलत्याच 'ड्रग्ज'चा वापर केल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले, तर अनेकांच्या जीवावर बेतले. यातील जीवावर बेतलेल्या पीडितांनी बेडकाविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. तर जीव गमवावा लागलेले काहीजण आता पुढे आले असून बेडकाविरुद्ध ठाण्यात सदोष मनुष्यवधाचे कायदेशीर गुन्हे दाखल करणार आहेत. बेडकाने अनेक बनावट परवाने, खोटी कागदपत्रे सादर करून गेल्या काही वर्षांपूर्वी हा बेकायदेशीर 'गोरखधंदा' सुरू केलाय. ज्या जागेवर धंदा सुरू आहे ते बांधकाम देखील नियमांना डावलून, अनधिकृत, बेकायदेशीर उभारल्याचे परिषदेच्या तपासणीत समोर आलेय. अशा एक ना अनेक कायदे मोडल्याने प्रशासन स्तरावर बेडकाच्या अनेक चौकशा सुरू आहेत. माहिती अधिकाराच्या माहिती नंतर बऱ्याच लवकरच सुरू होणार आहेत. याशिवाय बेडकाविरुद्ध यापूर्वीच्याच अनेक प्रलंबित गुन्ह्यांच्या प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहेत. त्यात लफडेबाजीपासून दरोड्यापर्यंतच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
लवकरच जेलवारी
आधीचीच पापे कमी होती की काय म्हणून बेडकाने आणखी गंभीर गुन्हे करून ठेवलेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमार्फत धमकवणे, बदनामीची सुपारी देणे, अपहरणाचा बनाव करणे, जीवे ठार मारण्याची सुपारी देणे आदी गंभीर गुन्ह्याचा समावेश आहे. कायद्याने गंभीर असणाऱ्या या गुन्ह्यांमध्ये मास्टरमाइंड बेडूक पुरते अडकले असून त्यास लवकरच 'जेलवरी'ला जावे लागणार आहे.'सुपारीं'चे बिंग फुटले
'सुपारी' बहाद्दर येणार अडचणीत
बेडकाने ज्यांना-ज्यांना सुपाऱ्या दिल्यात ते सर्व कुख्यात कुन्हेगार व इतर अडचणीत सापडले आहेत. या आधीच पीडितांनी आपल्या जीवाला धोका असल्याच्या तक्रारी ठाण्यात दिलेल्या आहेत. तसेच वरिष्ठ अधिकारी, गृहखात्याकडे पाठवलेल्या आहेत. या अर्जात समोर आलेल्या काही सुपारी बहाद्दरांची नावे आधीच धमकावल्या प्रकरणी नमूद आहेत. त्यामुळे ही मंडळी कायद्याच्या कचाट्यात अलगत अडकणार हे निश्चित.'गुप्त ऑपरेशन'द्वारे भक्कम पुरावे समोर
गेल्या दोन-तीन महिन्यापासून सुरू असलेल्या बेडकाच्या सर्व हालचालींवर 'गुप्त ऑपरेशन'द्वारे करडी नजर ठेवली जात होती. यामध्ये 'सुपारी' कांड करण्यामागील मास्टरमाइंड बेडुकच असल्याचे उघड झाले आहे. गुप्त ऑपरेशन मध्ये अनेक सक्षम पुरावे हाती आले आहेत. भेटीचे फोटो, व्हिडिओ, तसेच एकमेकांशी झालेले कॉल रेकॉर्ड, घटनास्थळीचे मोबाईल लोकेशन आणि धमक्यांचे व्हिडिओ, मोबाईल रेकॉर्डिंग आदी भक्कम तांत्रिक पुरावे मिळाले आहेत. प्रत्यक्षदर्शी अनेक साक्षीदार देखील आहेत. हे सर्व 'ईव्हीडन्स', गुन्ह्याचा 'मोटो' निश्चित होऊन बेडकासह बेड्या पडून, गुन्हे दाखल होऊन कठोर शिक्षा होण्यास अगदी परिपूर्ण आहेत.
क्रमशः
क्रमशःवाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसादलोकडाऊन मधील वाचकांचा 'स्ट्रेस' कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलेली 'बेडूक-लांडग्या'ची भन्नाट 'गोष्टींची मालिका' सर्वांना चांगलीच भावली आहे. आपल्या आजूबाजूलाही असे 'पापी बेडूक- भामटे लांडगे' असल्याची अनुभूती मिळत असल्याची भावना वाचकांमधून व्यक्त होत आहे. रोज हजारो वाचकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आणखी चालू ठेवण्याची मागणी होत आहे. तसेच अनेक वाचक गोष्टीत समाविष्ट करण्यासाठी 'रंजक' माहितीही देत आहेत. एकूणच वाचकांची वाढती उत्सुकता आणि आग्रहाखातर ही मालिका अशीच चालू रहाणार आहे. हजारो वाचकांच्या प्रतिसादाबद्दल 'MBP LIVE 24' टीम कडून मनःपूर्वक धन्यवाद .
आजच्या गोष्टीची शिकवण :
1. बुरे कामो का नतिजा हमेशा बरा होता है
2. वाईट लोकांची संगत आपल्याला नेहमी अधोगतिकडेच घेऊन जाते
3. पीडित, अन्याय ग्रस्तांचा तळतळाट वाया जात नाही
4. कधीही समोरच्यास कमकुवत समजून डाव खेळू नका
उद्याची गोष्ट
बेडकाचा प्रवास : लोकांच्या जीवाशी खेळणे, लफडेबाजी, दरोडा ते 'सुपारी मास्टरमाइंड'