मोठी बातमी... जिओ-गुगलचा 'हा' सर्वात स्वस्त फोन होणार लॉन्च, गणेश चतुर्थीचा मुहूर्त

मुंबई (MBP LIVE 24):


गुगल आणि जिओ टीमने 'जिओ फोन नेक्स्ट' हा नवा फोन विकसित केला आहे. याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी 44 व्या वार्षिक बैठकीत ही घोषणा केली आहे.

जिओ फोन नेक्स्ट जगात स्वस्त
मुकेश अंबानी म्हणाले,  की गूगल आणि जिओने संयुक्तपणे जिओ फोन नेक्स्ट तयार केला आहे. हा एक संपूर्ण फिचर स्मार्ट फोन आहे. हा स्मार्टफोन भारत आणि जगभरातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असल्याचा दावा जिओकडून करण्यात आला आहे.

संपूर्ण फीचर्स उपलब्ध
10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून हा फोन बाजारात उपलब्ध होईल. भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार केलेल्या जियोफोन नेक्स्ट स्मार्टफोनवर वापरकर्ते गुगल प्ले वरून अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात. स्मार्टफोनला सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा मिळतील. मुकेश अंबानी यांनी संपूर्णपणे फिचर स्मार्टफोनचे वर्णन केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून केले आहे.

न्यू इंटरनेट युजर्ससाठी
गेल्या वर्षी रिलायन्स जिओने गुगलबरोबर भागीदारीची घोषणा केली होती. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई नवीन स्मार्टफोनविषयी म्हणाले, “आमचं पुढचं पाऊल गुगल आणि जिओच्या सहकार्याने नवीन, परवडणार्‍या जिओ स्मार्टफोनपासून सुरू होत आहे. हा फोन भारतासाठी तयार करण्यात आला असून त्या लाखो नवीन वापरकर्त्यांसाठी आहे, जे पहिल्यांदाच इंटरनेटचा अनुभव घेतील.

नवीन 5 जी भागीदारी
गूगल क्लाऊड आणि जिओ दरम्यान नवीन 5 जी भागीदारी अब्जाहून अधिक भारतीयांना वेगवान इंटरनेटला जोडण्याला मदत करेल. सोबत भारताला डिजिटल करण्याची ही पायाभरणी असेल.


'जिओ' सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर
रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर बनल्याचे कंपनीने सांगितले आहे. केवळ मागील वर्षात डेटा खपातील ही 45% वाढ आहे. शिवाय, वापरकर्त्यांनी दरमहा 630 कोटी जीबी वापरला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

425 दशलक्षाहूनही अधिक ग्राहक
44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मुकेश अंबानी यांनी खुलासा केला की, रिलायन्स जिओने या वर्षात 37.9 दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडले आहे. कंपनी आता 425 दशलक्षाहूनही अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा 86,493 कोटी रुपये इतका आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !