ही गोष्ट आहे एका भामट्या चोराची. भामटेगिरीत सराईत हा लबाड एका आटपाट नगरात खालच्या आळीतील 'दक्षिणमुखी' घरात रहायचा. 'अव्या'च्या सव्वा खर्च करणे, मोठ्या गप्पा हाणणे हा याचा धंदा. या भामट्याने लाळघोटल्याने जवळच्याच एका पतपेढीत गावातील लोकांचे 'धन' नेऊन जमा करायचे काम त्याला मिळाले. मात्र, पुढे त्याने आपले रंग उधळले आणि आपली आणि कुटुंबाची मथुरा पाण्यात घातली.
विश्वासघात
रक्तातच भामटेगिरी असल्याने त्याने आपली 'हात की सफाई' दाखवायला सुरुवात केली. गडी लोकांकडून रोज 'धन' घ्यायचा, मात्र त्यातील काही धन काढून घ्यायचा. ते पेढीत नेऊन भरत नसे. थोडेच नेऊन भरायचा. मात्र, एके दिवशी ही भामटेगिरी उघड झाली. चोरी करून त्याने स्वतःबरोबर खानदानीचे तोंड काळे केले होते. चोरी पकडली गेल्याने आणि आता आपल्याला गाव पंचांसमोर उभे करून शिक्षा देणार म्हणून तो गयावया करायला लागला. रडायला लागला. पायावर लोळण घ्यायला लागला. पेढीच्या श्रेष्ठींनी मोठे मन करून त्याला पदरात लपवले. मात्र, हा पदर देखील त्याने फाडला.
दुसऱ्यादा चोरी पकडली आणि हाकलला
कारण, चोरी सोडील तो हा भामटा चोर कसला, त्याने पुन्हा आपले रंग दाखवत मोठा गफला केला. अनेकांच्या कष्टाने कमविलेल्या जमापुंजीवर डल्ला मारला. मात्र, त्याची चोरी पुन्हा पकडली गेली. यावेळी गावभर बोंब झाली. फसवणूक झालेल्यांनी पिढीवर देखील ताशेरे ओढले. यावेळी मात्र पेढी श्रेष्ठींनी त्याला लात घालून काढून दिले. ज्यांचे कष्टाचे धन बुडवले अशा काहींनी भामट्या लांडग्याला चांगलाच चोप दिला. त्याला ठाण्यात नेणार तोच, पैसे देतो अशी 'हमी' देऊन हातपाय जोडून, रडून सुटका करून घेतली.काळे तोंड लपवून पळाला
फसवणुकीच्या कृत्यांमुळे गावात पत राहिली नाही. कोणी कामावर ठेवीना. नीट बोलेना. भीक मागून पैसेही देईनात. रोज घरी येऊन गुतवणूकदार शिव्याशाप देऊ लागले. धुलाई करू लागले. गावातून फिरणे अवघड झाले. या नालस्तीमुळे हा भामटा रात्रीच्या काळोखात आपलं काळ तोंड लपवून नदीच्या पल्याड पठानवाडीत पळून गेला.
पुन्हा उधळले रंग
मोठ्या मुश्किलीने त्याला तेथे एका संस्थेत काम भेटले. काही दिवस जात नाही तोच त्याने पुन्हा भामटेगिरी सुरू केली. संस्थेचे छपाईचे काम एका ठिकाणी असायचे. भामटा लांडगा संस्थेकडून धन घ्यायचा मात्र छपाईवाल्यास देत नसे. संस्थेकडून घेऊन देतो म्हणून सांगायचा आणि दिवस ढकलायचा. मात्र, काहीतरी गफलत होतेय हे लक्षात आल्यावर छपाईवाला गेला संस्थेकडे. तेथे भामट्या लांडग्याचं पितळ उघडं पडलं. संस्थेने लांडग्याकडे पैसे दिल्याचे उघड झाले.
कोठडीत 'धुलाई' आणि तुरुंगवारी
संस्था मालकाच्या शिपायांनी काळानीळा होऊस्तोवर भामट्याची धुलाई केली. नंतर दिला ठाण्यात. तेथील शिपायांनी 'पिपळा'च्या खालील कोठडीत ठेऊन निबार हाणला. काही दिवस येथेच उघडा ठेवला. फक्त चड्डीत धुलाई करायचे. पार दयनीय अवस्था केली. काही दिवसांनी रझाबादच्या तुरुंगात रवानगी केली भामट्या चोराची. कोठडीत मार खाऊन त्याची चांगलीच शमली होती. काही महिने तेथेच खितपत पडून रहावे लागले. नंतर सुटका झाली.
भामटा परतला गावाकडे
पठानवाडीतही तोंड काळे केले या भामट्या चोराचे. मग, हा भामटा निर्लज्जपणे पुन्हा मूळगावी आला. काही दिवस दबा धरून राहिला. पण, चोरीची सवय लागली ती जाईल कशी. पण, कोठडीतली 'धुलाई' आठवायची आणि पुन्हा गप्प बसायचा. शेवटी चोरट्याने लोकांना गंडा घालायचा दुसरा प्लॅन बनवला. लुबाडण्याचा गोरखधंदा
अचानक आपण 'पत्रकदार' असल्याचे सांगत मिरवायला लागला. काही काळ गेल्यावर त्याने लोकांना लुबाडण्याचा 'गोरखधंदा' सुरू केला. नियम, कायदे मोडलेल्याशी संपर्क साधायचा आणि पैसे मागायचे काम सुरू केले. अडचणीत सापडलेले त्याला हजार-पाचशे देऊ लागले. लोकांनी फेकलेल्या या हाडाच्या तुकड्यांवर तो आपला व कुटूंबाच पोट भरू लागला. या हरामाच्या कमाईवर हा सराईत भामटा चोर उजळ माथ्याने फिरायला लागला. मात्र, आपला चोरीचा, भामटेगीरीचा, कोठडीतील धुलाई, तुरुंगवारी, चरित्रहीन कृत्ये जगासमोर आणणारा एखादा सच्चा 'बब्बरशेर' आपल्याला भेटेल, ही बाब हा भामटा विसरला आणि फसला.
'बब्बर शेर' शी पंगा
राज्यातील भ्रष्ट, गुन्हेगार यांच्यात दहशत असलेल्या गावातील एका 'बब्बर शेर'ला छेडले. ते देखील बेकायदेशीर कृत्य करून अडकलेल्या एका पापी बेडकाने फेकलेल्या हाडाच्या तुकड्यांसाठी. पापी बेडूक आणि भामट्या चोर लांडग्याची झालेली 'अभद्र युती' गावाने ओळखली. पुढे हे दोघेच गुन्हेगारीत अडकले. 'बब्बर शेर'ने 'पत्रकदार' म्हणून फिरणाऱ्या पूर्वाश्रमीच्या लुटारू चोर असणाऱ्या 'भामट्या'ची पोलखोल केली.... क्रमश: