शेवगाव (MBP LIVE 24) :
शेवगाव ग्रामीण रुग्णालय आणि बोधेगाव आरोग्य केंद्रात लसीकरणात होणारी भामटेगिरी उघड्यावर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील आरोग्य अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच कर्मचारी हा सावळा गोंधळ करत असल्याचा आरोप करत सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बोधेगावचे आरोग्य केंद्र तर खासगी लोकांनीच ताब्यात घेतल्याचे भयानक वास्तव उजेडात आले आहे.शेवंगावला लोकांच्या डोळ्यात धूळफेक
शेवगाव ग्रामीण रुग्णालयात परवा 300 डोस आले होते. मात्र प्रत्यक्षात लस देण्यासाठी लाईनमध्ये असणाऱ्या 250 जणांनाच टोकन दिले. मात्र 300 डोस आले असताना 250 टोकनच का दिले म्हणून नागरिकांनी जाब विचारला. मग आणखी 30 जणांना लस दिली. 'त्या' लस कुणाला विकायच्या होत्या?
मग ह्या 50 लस कोणासाठी लपवून ठेवायच्या होत्या. येथील डॉक्टर या लस पैसे घेऊन दुसर्यांना गुप्तपणे विकतात काय, असे अनेक प्रश्न जनतेमधून उपस्थित होत आहेत. एकूणच येथील लस चोरीची भामटेगिरीच उघड्यावर आली आहे. या परिस्थितीत येथील जबाबदारी असणारे डॉ. रामेश्वर काटे काय करतात. त्यांच्या परवानगी शिवाय हा प्रकार कसा होऊ शकतो. ते या गंभीर बाबीकडे का लक्ष घालत नाहीत. की त्यांना त्यांच्या खासगी स्कॅन सेंटर मधून फुरसत मिळत नाही, असा संतप्त सवाल केला जात आहे.
डॉ. काटे करतात काय?ग्रामीण रुग्णालयात लसीकरणावेळी हा अनागोंदी कारभार होत असताना येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे हे कुठे असतात. या गोष्टी येथे होत्यातच कशा? नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक कशी केली जाते? लस कशासाठी लपविल्या जातात? याला डॉ. काटे यांचा छुपा पाठींबा आहे काय, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत. या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी डॉ. काटे यांची नाही काय? ते याकडे लक्ष घालून ही अनागोदी थांबवणार नसतील तर त्यांना कार्यमुक्त करायला हवे, अशा संतप्त भावना लोकांमधून व्यक्त होत आहेत.
'भामटेगिरी'वर तहसीलदार मॅडम कारवाई करणार?
कोरोनवर दारूचे उपचार करतो असे म्हणणाऱ्या डॉक्टरवर तहसीलदार पागिरे-भाकड यांनी तात्काळ कारवाई केली. शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आलेल्या 300 लस पैकी 50 लस लपून ठेवण्याचा प्रकार त्याहीपेक्षा जास्त गंभीर आहे. हा प्रकार शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत उजेडात आला आहे. येथील जबाबदार अधिकारी हे डॉ. रामेश्वर काटे आहेत. त्यांच्यावर डॅशिंग तहसीलदार या कधी कारवाई करतात याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.